दोडामार्ग (वा.)
मणेरी येथे तिलारी नदीपात्रात अनोळखी मृतदेह आढळून आला आहे.तो मृतदेह पुरुष जातीचा असून सडलेल्या अवस्थेत आढळला.दोडामार्ग ते बांदा मार्गावर असलेल्या मणेरी पुलाजवळ तिलारी नदी पाञात शनिवारी (ता.4) दुपारी काही युवक नदी किनारी बागेत जात असताना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी शोधशोध केली असता सडलेल्या अवस्थेतेतील मृतदेह आढळून आला .
दोडामार्ग पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी घटनास्थळी भेट दिली. सामाजिक कार्यकर्ते सज्जन धाऊसकर यांच्या मदतीने मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात आला . मृतदेहाची ओळख पटलेली नाही. त्याच्या हातात बेस्ट फ्रेंड पट्टा आहे. नदी पाजात आंघोळीसाठी उतरला असता मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा कामगार असण्याची शक्यता आहे.
उपड्या अवस्थेत पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह दिसताच युवकांनी माजी
सरपंच आत्माराम नाईक याना माहिती दिली.तर युवासेनेचे तालुकाप्रमुख भगवान गवस यानी पोलिसांना माहिती दिली.
दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक भगत, नाईक, समीर सुतार वाहतूक पोलिस जाधव, इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
