रेडी येथील स्टॉलला आग 27 हजार रुपयांचे नुकसान…

⚡वेंगुर्ले ता.०४-: रेडी माऊली मंदिर जवळ प्लॅस्टिक ताडपत्रीने साकारलेल्या देवीचे ओटीसाठी सामान विक्रीचा स्टॉलला अचानक आग लागून सुमारे २७ हजार रूपयांचे नुकसातन झाले. या प्रकरणी स्टॉलचे मालक रेडी नागोळेवाडी येथील श्रावण दाजी सुर्याजी यांनी वेंगुर्लेत पोलीसांत दिलेल्या तक्रारीनुसार जळीत म्हणून नोंद झाली आहे.


रेडी नागोळेवाडी येथील श्रावण दाजी सुर्याजी यांचे माऊली मंदिर नजीकच्या स्टॉलला दि. 3 मे रोजी रात्री 8 वाजता ते दि. 4 मे रोजी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास अकस्मित आग लागून झालेल्या नुकसानीत वेगवेगळ्या कंपन्यांचे लहान मोठे अगरबत्ती पुढे सुमारे १५ हजार, देवीच्या ओटीसाठी लागणाऱ्या १५ हिरव्या रंगाच्या नऊवारी साड्या सुमारे किमंत ३७५० रूपये, ओटीसाठी लागणारे १०० हिरव्या रंगांचे खण सुमारे किंमत १५०० रूपये, ओटीससाठी लागणारे ५० नारळ सुमारे किंमत १२५० रूपये, ओटीसाठी लागणारे तांदुळ ४९ किलो सुमारे किमंत १५०० रूपये, दोन स्टीलच्या जुन्या वापरत्या टाक्या सुमारे किंमत ६०० रूपये, ओटीचे सामान देण्यासाठी लागणारी जुनी फायबरची १२ व स्टीलची ८ अशी २० ताटे सुमारे किमंत ६०० रूपये, चार वापराची जुनी टेबले सुमारे किंमत २४०० रूपये असा एकूण २६,८००/- रुपयांच्या मालाचे नुकसान झाले.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदिप भासले यांच्या मार्गदर्शनाखाली रेडी पोलीस ठाण्याचे अंमलदार ए. जे. घाटकर अधिक तपास करीत आहेत.

You cannot copy content of this page