⚡कणकवली ता.०४-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातून रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले.
या रॅलीत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबीद नाईक, जिल्हा बँकेच्या संचालिका प्रज्ञा ढवण, संचालक विठ्ठल देसाई, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सावळाराम अणावकर, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, सुनील पारकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, माजी नगरसेवक संजय कामतेकर, किशोर राणे, रवींद्र गायकवाड, अभिजीत मुसळे, अजय गांगण, शिशीर परुळेकर, अभय राणे, अॅड. विराज भोसले, माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे, मेघा गांगण, राजश्री धुमाळे, भाजपच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, सुशील पारकर, भरत उबाळे, महेश नार्वेकर, संजना सदडेकर, प्राची कर्पे, प्रियाली कोदे, गीतांजली कामत, सुप्रिया पाटील, संदीप राणे, महेश सावंत, दिलीप वर्णे, उत्तम वाळके, सुभाष उर्फ बाबू सावंत, विलास गावकर, चारुदत्त साटम, भैय्या आळवे, सचिन कुवळेकर, गौरव हर्णे, राज नलावडे, सागर राणे, नऊ झेमणे, जावेद शेख, राजा पाटकर, पंकज पेडणेकर, इम्रान शेख, यांच्यासह भाजपचे युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीत महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
‘फिर एक बार मोदी सरकार’, ‘अबकी बार 400 पार’, ‘नारायण राणे तुम्ह आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’ अशी घोषणाबाजी केली. रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी नागरिक व दुकानदारांना राणेंना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी महायुतीच्या नेत्यांची व पक्षांची चिन्हे असलेले उपरणे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिधान केली होती, हे चित्र लक्षवेधी ठरले. रॅलीचा शुभारंभ पटकीदेवी येथे झाला. त्यानंतर बाजारपेठमार्गे ही रॅली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभास्थळी दाखल झाली. याठिकाणी रॅलीचा समारोप झाला.
