नगराध्यक्षानी पाठविले कर्मचारी नागरिकांत समाधान
सावंतवाडी-: केसरी येथे पाण्याची पाईप लाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. ही बाब तेथील नागरिकांनी तात्काळ नगराध्यक्ष संजू परब यांच्या निदर्शनास आणून देताच या घटनेची तात्काळ दखल घेत नगराध्यक्ष संजू परब यांनी ती पाईप लाईन दुरुस्ती करण्यासाठी कर्मचारी पाठवले आहेत. नगराध्यक्ष संजू परब यांनी दाखवलेल्या या कार्य तत्परते मुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
