निधीचा झाला चक्काचुर;व्यावसायीकांचा आरोप
*💫आंबोली दि.२७-:* सावंतवाडी तालुक्यातील प्रसिद्ध आंबोली सारख्या पर्यटन स्थळासाठी लाखोच्या पटीत आलेल्या निधीचा चक्काचूर झाला असून, आंबोलीत सर्व पॉइंट कडे जाणारे सर्व रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. त्यामुळे आंबोली पर्यटन धोक्यात आले आहे. सद्य स्थितीत बाहेरून आलेले पर्यटक एकही दिवस आंबोली मध्ये वास्तव्य करण्यास पाहत नाही आहेत. या सर्वाला आंबोली येथील पर्यटन स्थळाची झालेली दयनीय स्थिती जबाबदार असल्याचा आरोप येथील व्यवसायिकांनी केला आहे. यावेळी आंबोली पर्यटनाचे शिल्पकार कुठे गेले? , आंबोलीला दत्तक घेणारे मानसपुत्र कुठे गेले ? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. आंबोली पर्यटन भकास होत असताना. लाखो रुपयांचा आकडा फुगवून सांगणारे या स्थळांकडे पाहत देखील नसल्याचा आरोप येथील व्यवसायिकांनी केला आहे. आंबोली पर्यटन सलग्न गावाला जोडण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
