बांदा/प्रतिनिधी
बांदा-वाफोली रस्त्यावर वाफोली नळपाणी योजनेच्या विहिरीजवळील रस्त्यालगतच्या गटारात तारीख होऊन गेलेल्या औषधच्या कचऱ्याचा साठा उघड्यावर टाकण्यात आल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावावी तसेच कचरा टाकणाऱ्याला सक्त ताकीद द्यावी अशी मागणी वाफोलीचे सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने तारीख बाह्य औषधे (गोळ्या, इंजेक्शन, बाटल्या) उघड्यावर फेकून दिल्यात. हे काम कुणा औषधालंय असणाऱ्या व्यक्तीचे असावे अशी शक्यता श्री गवस यांनी व्यक्त केली आहे. सदरचा कचरा हा उघड्यावर टाकणे हे नियमबाह्य आहे. या मार्गावरून सातत्याने लोकांची वर्दळ असते. तसेच येथून नजिकच वाफोली गावची नळपाणी योजनेची विहीर आहे. त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा उघड्यावर टाकण्यात आल्याने याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायत सदस्य सौ. गौरी गवस यांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. याबाबत मेडिकल कौन्सील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.
वाफोली नळपाणी योजनेच्या विहिरी नजिक गटारात औषधाच्या कचऱ्याचा साठा…
