सावंतवाडीतील व्यापाऱ्यांच्या गाठीभेटीवर दिला भर:आपल्या मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा केलाय निर्धार
⚡सावंतवाडी ता.०४-: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला अवघे दोन दिवस शिल्लक असताना मंत्री दीपक केसरकर हे आता शहरातील प्रचारात ऑन फिल्ड उतरले आहेत. सध्या ते व्यापाऱ्यांची गाठीभेटी घेऊन जोरदार प्रचार करत आहेत. त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते देखील प्रचारात सहभागी झाले आहेत.
दरम्यान नारायण राणे यांच्या विजयासाठी गेले काही दिवस जोरदार प्रचार करणाऱ्या केसरकर यांनी राणेंना सावंतवाडीतून सर्वाधिक मते मिळवून देण्याचा निर्धार केला आहे.
