कणकवलीत आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार…

सभेत परशुराम उपरकर ‘उद्धव’मार्ग स्वीकारणार..

⚡कणकवली ता.०३-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी सायंकाळी 6 वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेला ठाकरे शिवसेनेचे नेते, महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या सभेत माजी आमदार परशुराम उपरकर हे स्वगृही परतणार असून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उपरकर आपल्या हाती शिवबंधन बांधणार आहेत.


उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी येणार्‍या जनसमुदायासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. कणकवली, देवगड, वैभववाडी, कुडाळ, मालवण तालुक्यातील मंडळीची सभास्थळी येण्याची व्यवस्था ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी आमदार वैभव नाईक व सेनेच्या पदाधिकार्‍यांनी सभा स्थळाची पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला.

You cannot copy content of this page