मालवणात मशाल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

मालवण दि प्रतिनिधी
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो… खास. विनायक राऊत यांचा विजय असो… अशा घोषणा देत खासदार विनायक राऊत व आम. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज रात्री मालवण शहरातून भव्य मशाल फेरी काढण्यात आली. ठाकरे शिवसेनेच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारीही रॅलीत सहभागी झाले होते.

मालवण येथील ठाकरे शिवसेना शाखा येथून या मशाल रॅलीला सुरुवात झाली. शाखेकडून भरड नाका येथून बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळपार येथे या रॅलीची समाप्ती झाली. या रॅलीत खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी मशाल हाती घेत जनतेला अभिवादन करत मार्गक्रमणा केली. या रॅली दरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

या रॅलीत ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवतीसेना जिल्हा विस्तारक रुची राऊत, नितीन वाळके, महेश जावकर, मंदार केणी, भाई कासवकर, सेजल परब, दीपा शिंदे, आकांक्षा शिरपूटे, पूनम चव्हाण, निनाक्षी शिंदे, तृप्ती मयेकर, नरेश हुले, तपस्वी मयेकर, मनोज मोंडकर, मंदार ओरसकर, राष्ट्रीय काँग्रेसचे साईनाथ चव्हाण, बाळू अंधारी, जेम्स फर्नांडिस यांसह मालवण तालुक्यातील ठाकरे शिवसेनेचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page