महायुतीच्या उत्स्फूर्त रॅलीतून संजू परबांनी दाखवून दिली ताकद…

सावंतवाडीच्या महायुतीच्या रॅलीला प्रंचड प्रतिसाद; निलेश राणेंनी केलं संजू परब यांचे कौतुक..

⚡सावंतवाडी ता.०२-:
लोकसभा निवडणुक अगदी दोन चार दिवसावर आली असतांनाच आज सावंतवाडी शहरात काढण्यात आलेल्या महायुतीच्या रॅलीला मिळालेला प्रंचड प्रतिसाद पाहता माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी एकप्रकारे आपली ताकद याठिकाणी दाखवून दिली.

दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर सौ. नीलम राणे माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत काढलेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. एक प्रकारे या रॅलीने नारायण राणेंच्या विजयाचा पथका फडकवण्याचे दिसून आले माजी नगराध्यक्ष श्री परब ही रॅली यशस्वी करण्यात उजवल ठरले असून याबद्दल माजी खासदार निलेश राणे यांनी परब यांचे कौतुक केले.

You cannot copy content of this page