साळशी धनगरवाडीतील जलजीवनच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्याचे दिले लेखी पत्र..
देवगड :प्रतीनीधी
देवगड तालुक्यातील साळशी धनगरवाडी येथील जलजीवन मिशनअंतर्गत नळयोजनेचे काम सुरू न झाल्याने येथील पाणीटंचाई भेडसावत असल्यामुळे धनगरवाडी ग्रामस्थांनी पुन्हा देवगड गटविकास अधीकारी वृक्षाली यादव यांची भेट घेवून आश्वासन म{ळूनही काम सुरू न झाले नाही याकडे लक्ष वेधले व काम सुरू करणेबाबत लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषणाला बसण्याचा निर्णय स्थगीत करणार नाही असा पवित्रा घेतला.ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासनाने दखल घेवून संबंधीत कामाचे सुधारीत अंदाजपत्रक तयार करून काम तात्काळ सुरू करणेबाबत लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
देवगड तालुक्यातील साळशी धनगरवाडी येथील जलजीवन मिशनअंतर्गत नळयोजनेचे काम मुदत संपुनही अपुर्णावस्थेत आहे याबाबत ग्रामस्थांनी २५ एप्रिल रोजी गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांची भेट घेवून लक्ष वेधले होते. यावेळी संबंधीत अधीका-यांशी चर्चा करून तात्काळ काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते मात्र आठ दिवस होवूनही काम सुरू न केल्याने साळशी धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी गुरूवारी सकाळी शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांच्यासमवेत गटविकास अधीकारी वृक्षाली यादव यांच्या दालनात भेट घेतली.यावेळी पोलीस निरिक्षक अरूण देवकर, पो.कॉ.निलेश पाटील उपस्थित होते.
विलास साळसकर यांनी यावेळी ऐन टंचाई काळात साळशी धनगरवाडी येथील नळयोजनेचे काम अपुर्णावस्थेत असून यामुळे येथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.याबाबत गांभीर्याने दखल घेवून कार्यवाही करावी अन्यथा निवेदनाद्वारे दिलेल्या उपोषणाच्या इशा-याप्रमाणे उपोषण छेडावे लागेल तसेच न{वडणुकीवर बहीष्कार कायम ठेवावा लागेल असा इशारा दिला.यावेळी गटविकास अध{कारी वृक्षाली यादव यांनी ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्री.महाजनी व शाखा अभियंता सुर्यवंशी तसेच संबंधीत काम करणारी एजन्सी यांच्याबरोबर चर्चा करून या कामाचे सुधारीत अंदाजपत्रक तयार करून काम तात्काळ सुरू करावे अशा सुचना दिल्या.जोपर्यंत सुधारीत अंदाजपत्रक तयार करण्याचे व काम तात्काळ सुरू करण्याचे लेखी पत्र संबंधीत ठेकेदार एजन्सीला देत नाहीत तोपर्यंत आम्ही निर्णयावर ठाम असल्याचे साळशी धनगरवाडी येथील उपस्थित ग्रामस्थांनी सांगीतले.यावेळी गटविकास अधीकारी वृक्षाली यादव, पोल{स निरीक्षक अरूण देवकर, श{वसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर व ग्रामस्थ यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानंतर कार्यकारी अभियंता महाजनी यांनी संबंधीत एजन्सीला जल जीवन मिशनअंतर्गत साळशी धनगरवाडी विहीरीचे काम तातडीने सुरू करण्यात यावे व सुधारीत जागेमध्ये विहीर चालु केल्यास होणा-या बदलानुसार आवश्यक ते सुधारीत अंदाजपत्रक दोन दिवसात कार्यालयात सादर करावे असे लेखी पत्र दिले.या पत्रानंतर साळशी धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी उपोषणाचा न{र्णय तुर्तास स्थगीत करीत आहोत अशी माहीती साळशी येथील ग्रामस्थ व शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी दिली.यावेळी साळशी गावचे उपसरपंच कैलास गावकर, ग्रामस्थ प्रभाकर साळसकर, वनिता खरात, विक्रांत नाईक, मंगेश नाईक, रमेश खरात, रामचंद्र खरात, बाबू खरात, सुजय खरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थांनी गटविकास अधीकारी वृक्षाली यादव यांना निवेदनही दिले.
