यूथ गेम आर्चरी क्रीडा प्रकार; १४ वर्षा खालील गटातील इंडियम राउंड यश
*💫देवगड दि.२६-:* रत्नागिरी येथे श्री. विठ्ठलराव जोशी धर्मादाय संस्थेच्या क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या युथ गेम च्या आर्चरी या क्रीडा प्रकारात देवगड वाडातर येथील धनुर्धर प्रांजली संजय वाडेकर हिने १४ वर्षाखालील मुलींच्या गटात इंडियन राऊंड मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. प्रांजली ही श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिर जामसंडे ची विद्यार्थिनी आहे. तिने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे.
