मराठी माणसाच्या अस्मितेबद्दल आम्हाला…

ठाकरे व राऊतांनी शिकवून नये : आम. नीतेश राणे..

कणकवली : महाराष्ट्रात प्रबोधनकार ठाकरे यांनी नेहरुंच्या विरुद्ध लढा दिला होता. त्या लढ्यातून महाराष्ट्र निर्माण झाला. त्याच नेहरू मांडीवर बसणारा उद्धव ठाकरे सर्वात मोठा मोठा गद्दार आहे. नेहरूंच्या, गांधींच्या मांडीवर बसणार्‍या उद्धव ठाकरे व संजय राऊतांनी मराठी माणसाच्या अस्मितेबद्दल आम्हाला शिकवू नये. 10 जनपथमध्ये आमची मम्मी बसते असे बोलणारे हुतात्म्यांना अभिवादन करत असतील तर हुतात्मा चौकमध्ये गोमूत्र शिंपडून परिसर शुद्ध पाहिजे, अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नीतेश राणे यांनी केली.
प्रहार भवन येथे पत्रकारांशी श्री. राणे बोलत होते. राणे म्हणाले, उद्धव ठाकरे व संजय राऊतांनी असंख्य मराठी माणसांना बेघर केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मी व भाजप नेत्यांना नाव ठेवताना राऊतांला लाज वाटली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र लुटण्यापलीकडे यांनी काही काम केले नाही. मुंबईमधील मराठी माणूस कमी करण्याची सुपारी उद्धव ठाकरेंनी घेतली आहे, असा आरोप त्यांनी केला.
नरेंद्र मोदी व अमित शहा हे शिवरायांचे मावळे आहेत. त्यांनी महाराष्ट्र वाचवलं अन्यथा औरंग्याचं स्मारक उद्धव ठाकरेंनी बांधल असत. बरबटलेल्या आत्म्यांनी दुसर्‍यांना बोलू नये. उद्धव ठाकरे हे औरंग्याच्या व याकूब मेमनच्या कबरीचा सुशोभिकरणं करणार होते. महाराष्ट्र झुकला नाही पण तुझा मालक एवढा झुकला की मानेला पट्टा लागला, असा टोला राणेंनी लगावला. उबाठा हा शरद पवार गट आहे. 22 पैकी 2 जागा निवडून येतील. शिवसेना ज्या जागा लढवतेय त्या सगळ्या जागावर बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा फडकेल. दैवत कस बदलायच यात चाटे क्लासमध्ये संजय राऊत शिक्षक आहे, अशी टीका राणेंनी केली.

You cannot copy content of this page