कासार्डेत उद्यापासून विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.०१- : कासार्डे-तांबळवाडी येथील श्री आवळेश्‍वर मंदिरात 2 ते 3 मे या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार 2 मे रोजी वाडीतील मुलांचे व महिलांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम होतील. शुक्रवार 3 मे रोजी सकाळी 9 वा. अभिषेक, श्री. सत्यनारायणाची महापूजा, तीर्थप्रसाद, दुपारी 1 वा. महाप्रसाद, 3 वा. महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी 5 वा. स्थानिक भजनी कलाकारांची भजने, रात्री 9 वा. श्री देवी सातेरी प्रा. भजन मंडळ, पावशी-कुडाळचे बुवा अरुण घाडी, श्री कोटेश्वर प्रा. भजन मंडळ हरकुळ बु. चे बुवा अभिषेक शिरसाट यांच्यात डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आवळेश्‍वर देवस्थान समिती व ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page