⚡कणकवली ता.०१-: लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या प्रक्रितेत शहरातून मतदानाचा टक्का वाढावा याकरिता कणकवली नगरपंयतीच्यावतीने गेले काही दिवस शहरात मतदानाबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती केली जात अाहे. यानिमित्त गुरुवार 2 मे रोजी सकाळी 8 वा. कणकवली नगरपंचायत कार्यालय ते आप्पासाहेब पटवर्धन चौक अशी लोकशाहीची दिंडी काढणार आहे. तरी शहरातील मतदारांनी दिंडीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.
कणकवली शहरात उद्या लोकशाहीची दिंडी…
