देवगड भाटी अमरवाडी सिद्धाइ इमारतीसमोरील घटना
*💫देवगड दि.२६-:* देवगड भाटी अमरवाडी सिध्दाई इमारतीसमाेर भाटीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या माेरीच्या पाण्यात एका अनाेळखी 50 वर्षीय व्यक्तिचा मृतदेह आढळला.ही घटना शुक्रवारी सकाळी 8 वा.सुमारास निदर्शनास आली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, देवगड भाटी अमरवाडी सिध्दाई इमारतीसमाेर रस्त्यालगत असलेल्या माेरीच्या पाण्यात एका अनाेळखी 50 वर्षीय व्यक्तिचा मृतदेह स्थानिकांना दिसला.त्यांनी तात्काळ देवगड पाेलिस स्टेशनला कळविल्यानंतर स.पाे.निरिक्षक एस्.एस.खंडागळे, पाेलिस हवालदार उदय शिरगावकर, पी.एन्.डगरे, पाे.काॅ.आगाव आदींनी घटनास्थळी धाव घेतली. माेरीच्या पाण्यात पालथ्या अवस्थेत मृतदेह हाेता.गुलाबी रंगाचे ुलशर्ट, काळी पँट, पायात तपकीरी रंगाची सँडल असा पेहराव हाेता. या घटनेची खबर पाेलिस पाटील आचल चंद्रशेखर कांदळगावकर यांनी दिली.पाेलिसांनी आकस्मिक मृत्यु म्हणून नाेंद केली असून तपास पाेलिस हवालदार पी.एन्.डगरे करीत आहेत.संबंधित मृतदेहाची ओळख पटेपर्यंत मृतदेह शवपेटीत ठेवण्यात आला आहे.
