⚡वैभववाडी ता.२९-: सोनाळी-वाणीवाडी येथील शिवसेना उबाठा पक्षाचे गटप्रमुख महेंद्र पाडावे व शिवसैनिक सत्यवान सुतार, संकेत नर, महेंद्र पाडावे, रघुनाथ पाडावे, रुपेश बोभाटे, विशाल पाडावे यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून कोणतीच विकासकामे होत नसल्याने आ. नीतेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून सोनाळी गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली.गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतोअसा विश्वास आपल्याला असल्यामुळे आम्ही प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला असे ते म्हणाले.
यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासह माजी सभापती अरविंद रावराणे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश शेलार, बूथ प्रमुख समाधान जाधव, आदि भाजप पदाधिकारी उपस्थित होते..
