⚡सावंतवाडी ता.२८-: लोकसभा निवडणुकीची सर्वत्र रणधुमाळी सुरु असून सावंतवाडी शहरात भटवाडी प्रभाग क्रमांक एक मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारचा शुभारंभ युवा नेता विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले.दरम्यान महायुतीच्या सर्व पदाधिकांकडून प्रभाग क्रमांक एक मध्ये जोरदार प्रचार सुरू करण्यात आला आहे.
यावेळी नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, दिलीप भालेकर, आशिष कदम, सत्यजीत देशमुख, सचिन साटेलकर, तेजस माने, केतन आजगांवकर, रवी नाईक यांच्यासह महायुतीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
