जयेंद्र परुळेकर यांचा सवाल; दीपक केसरकर यांचे निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन म्हणजे रात गयी बात गई..
सावंतवाडी ता.२८-: कोकणात बेरोजगारी आहे असे नारायण राणे यांनी राजापूरच्या सभेत जनतेला संबोधित करताना सांगितले, मात्र स्वतः पावणे तीन वर्ष केंद्रीय कॅबिनेट मंत्री होतात तर मग या ठिकाणी उद्योग का उभे राहू शकले नाहीत असा सवाल ठाकरे सेनेचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी आज इथे उपस्थित केला.
दरम्यान मंत्री दीपक केसरकर येथील मुलांना आपण जर्मनी भाषा शिकवणार असे सांगत आहेत, मात्र त्यांचे हे आश्वासन निवडणुकीच्या तोंडावर आहे. निवडणुका झाल्यावर रात गयी बात गई असा टोला श्री परूळकर यांनी मंत्री केसरकर यांना लगावला. येथील आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री परुळेकर बोलत होते.
