शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली विचारला जाब
*💫सावंतवाडी दि.२६-:* किनळे एस. टी बस प्रश्नावरून कॉलेज युवतींनी भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आज भाजप शहर अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी आज बस स्थानक अधिकाऱ्यांना घेराव घालत याबाबत जाब विचारला आहे. यावेळी भाजपचे सर्वच पदाधिकारी आक्रमक झाले होते. यावेळी एका वाहकाने त्या विद्यार्थ्यांची तक्रार संबंधित कॉलेज मध्ये केल्याने , भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे व नगरसेवक आनंद नेवगी हे आक्रमक होत त्या संबंधित वाहकाला चांगलेच धारेवर धरत तुम्हाला हा अधिकार कोणी दिला असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी किनळे बस नेहमी प्रमाणे सुरू करावी अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी सोमवार पासून नेहमी प्रमाणे ती बस सुरू होईल असे आश्वासन स्थानक प्रमुख शेवाळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी शहरध्यक्ष अजय गोंदावळे,नगरसेवक आनंद नेवगी,नगरसेवीका दिपाली भालेकर,युवक शहरध्यक्ष संदेश टेंमकर ;केतन आजगावकर, ग्रामपंचायत सदस्य अमित परब, प्रणिता वर्तक,विनोद सावंत,सुधा राणें,बंटी पुरोहित, परिक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते.
