उदयनराजे भोसले यांच्या विरोधात प्रचार का करताय…?

आमदार नीतेश राणेंचा संजय राऊतांना सवाल..

⚡कणकवली ता.२७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात प्रचार सभा आहे. या सभेवर बोलताना संजय राऊत यांनी कोल्हापूरच्या गादीचा, छत्रपतींच्या घराण्याविरोधात प्रचार करणे म्हणजे महाराजांच्या गादीचा अपमान करण्यासारखे सांगत मोदींच्या सभेवर टीका केली.जर कोल्हापूरला हा नियम लावत असाल तर साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या विरोधात प्रचार का करताय? स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून हा संजय राऊतांचा खोटा गुण आहे. राऊतांनी छत्रपतींच्या गादीकडे वंशजांचे पुरावे मागितले होते, त्याबद्दल आधी माफी मागावी, अशा शब्दांत भाजपा प्रवक्ते तथा आमदार नीतेश राणे यांनी शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले निवडणूक लढवत असताना तुम्ही त्यांच्या विरोधात का प्रचार करता ? असा सवाल राणेंनी केला. राऊत यांनी पंतप्रधान मोदी कोल्हापुरात येऊन छत्रपतींच्या गादी विरोधात प्रचार करतात, याचे मला आश्चर्य वाटले नाही असे उपहासाने राऊत म्हणाले. त्याचा समाचार घेताना राणे यांनी राऊत यांच्यावर सडकून टीका केली. कोल्हापूरमध्ये छत्रपतींच्या गादीला एक न्याय आणि साताऱ्यात दुसरा न्याय करण्यापेक्षा साताऱ्यात उदयनराजे विरोधातील उमेदवारी मागे घ्या मग आम्ही कोल्हापूरबाबत निर्णय घेऊ असे राणेंनी सुनावले. ज्यांचे 3 अंकी उमेदवार उभे नाहीत ते देशाला जाहीरनामा देत आहेत. उबाठा आणि शरद पवार गटाचा जाहीरनामा सकाळी मुलांच्या वापरांसाठी केला जाईल, असाही टोला राणे यांनी लगावला.

You cannot copy content of this page