केसरकर विकास करायला कमी पडल्यानेच त्यांना आता राणेंची पाय धरणाची वेळ आली…

प्रवीण भोसलेंची टीका: भाजप खोट्या आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करण्याचं काम करते..

⚡सावंतवाडी ता.२७-: मंत्री दीपक केसरकर यांनी पंधरा वर्षे मतदारसंघात विकास करायला कमी पडले त्यामुळे त्यांना आता नारायण राणेंचे पाय धरण्याची वेळ आली, अशी टीका माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केली. दरम्यान भाजप सरकार ही खोटी आश्वासन व फसव्या योजना राबवून जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका देखील श्री भोसले यांनी यावेळी केली. खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी तालुक्यात पंचायत समिती निहाय बैठकीचा आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री भोसले यांनी टीका केली.

यावेळी प्रवीण भोसले पुढे बोलताना म्हणाले भाजपने गेल्या दहा वर्षात जनतेला अक्षरशः रस्त्यावर आणले प्रचंड महागाई वाढली आहे, त्यामुळे जनता त्या सर्व गोष्टींना कंटाळली असून येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी यांची आता योग्य जागा दाखवावी असे आव्हाने श्री भोसले यांनी यावेळी केले.

यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी मा. विकास भाई सावंत, जिल्हा प्रमुख संजय पडते, उपनेते जानवी सावंत, विधानसभा संपर्क शैलेश परब, दिलीप नार्वेकर साक्षी वंजारी चंद्रकांत गावडे, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, मायकल डिसूजा, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, रवींद्र म्हापसेकर, समीर वंजारी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page