⚡कणकवली ता.२७-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविअाचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शनिवार 27 रोजी दुपारी 3 वा. कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील मनोहर मंगल कार्यालय येथे शिवसेनेचे नेते नितीन बानुगडे-पाटील यांची जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपनेत्या जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट व इतर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. नितीन बानुगडे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी जाहीर सभेस शिवसैनिकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे यांनी केले आहे.
माणगावात नितीन बानुगडे-पाटील यांची आज जाहीर प्रचारसभा…
