⚡कणकवली ता.२७-: कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त 10 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 8.30 वा. पासून अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, दुपारी 1 वा. महाप्रसाद, सायंकाळी 4 वा. स्थानिक भजने, रात्री 8 वा. पावशी येथील श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळााो बुवा आण घाडी आणि हरकुळ बु. येथील श्री कोटेश्वर नवताण भजन मंडळाचे बुवा अभिषेक शिरसाट यांच्यात डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. घाडी यांना पखवाज साथ विनीत धुरी यांची, तबला साथ जितेश परब यांची आहे. तर शिरसाट यांना पखवाज साथ रुपेश परब व तबला साथ अभिषेक सुतार यांची आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पटकीदेवी कला, क्रीडा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
पटकीदेवी मंदिराच्या वर्धापनदिनी 10 मे रोजी विविध कार्यक्रम…
