मनसेचे कसाल विभागाचे अध्यक्ष प्रमोद परब यांचा शिवसेनेत प्रवेश…

⚡कणकवली ता.२६-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कसाल विभागाचे अध्यक्ष प्रमोद परब यांनी कणकवली येथील विजय भवन येथे याठिकाणी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. वैभव नाईक यांनी परब यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर, अवधूत मालणकर, पडवेचे माजी सरपंच प्रभाकर गोसावी, छोटू पारकर आदी उपस्थित होते. कसालमध्ये प्रमोद परब यांना मानणारा मोठा वर्ग त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे महायुतीला धक्का बसला आहे.

You cannot copy content of this page