कै दादा ठाकुर स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संजीव राऊत प्रथम…

मालवण दि प्रतिनिधी
वाचन कला विकास समिती त्रिंबक संचलित ‘कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक’ यांचे वतीने घेण्यात आलेल्या कै. दादा ठाकूर स्मृतिप्रित्यर्थ जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धेत
संजीव आत्माराम राऊत, देवगड याने प्रथम क्रमांक पटकावला असून सायली गुरुनाथ म्हाडगुत, मसुरे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला

जनता विद्या मंदिर त्रिंबक येथे कै. दादा ठाकूर स्मृतिप्रित्यर्थ जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत श्रद्धा सत्यवान मडव, जांभवडे यांनी तृतीय क्रमांक तर संग्राम सतीश कासले मालवण, चंद्रशेखर चिंतामण हडप, काळसे यांनी उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून एकनाथ गायकवाड व अनघा कदम मॅडम यांनी काम पाहिले. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सुरेंद्र (अन्ना) सिताराम सकपाळ-अध्यक्ष वाचन कला विकास समिती त्रिंबक’ यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुरेश शामराव ठाकूर, ‘अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद मालवण’ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. स्पर्धेचे उद्घाटन विनिता कांबळी, ‘ग्रंथपाल रामेश्वर वाचन मंदिर आचरा’ यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेत एकूण 12 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज’, ‘सुशिक्षित होऊ या की सुसंस्कृत’, चांद्रयान ‘मोहीम आणि भारत’ व ‘छत्रपती शिवराय – जाणता राजा’ या चार पैकी एका विषयावर स्पर्धकांनी आपले विचार मांडले.

या स्पर्धेत विनिता कांबळी मॅडम व कदम सर सहाय्यक शिक्षक जांभवडे हायस्कूल, यांना पुरस्कार देण्यात आले यावेळी ग्रंथपाल अमेय लेले, सहग्रंथपाल विवेक जाधव, लिपिक, श्रीम गोसावी, चैताली सुतार हे ग्रंथालयीन कर्मचारी तसेच माध्यमिक शिक्षण समिती त्रिंबकचे माजी अध्यक्ष डॉ. सुधीर मेहेंदळे, जनता विद्या मंदिर त्रिंबकचे मुख्याध्यापक प्रवीण घाडी, प्रशांत मेहेंदळे, कार्यवाह, कासले, कदम, महेंद्र वारंग क्रीडा शिक्षक जनता विद्या मंदिर त्रिंबक आदी सदस्य उपस्थित होते. स्पर्धेचे प्रास्ताविक प्रवीण घाडी यांनी केले तर आभार ग्रंथपाल अमेय लेले यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र वारंग यांनी केले.

You cannot copy content of this page