देवगड मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡देवगड ता.२३-: महाविकास आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार खास.विनायक राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हाप्रमुख संदेश पारकर,शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी देवगड-जामसंडे गावाचे आराध्य दैवत श्री दिर्बादेवी रामेश्वराचे दर्शन घेत प्रचाराचा शुभारंभ केला. .

खास. विनायक राऊत यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला यावेळी शहरप्रमुख नगरसेवक संतोष तारी,युवा सेना
उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे,विभाग प्रमुख विकास कोयंडे,नगरसेवक नितिन बांदेकर, नगरसेवक तेजस मामघाडी, महेंद्र भुजबळ,कांग्रेस तालुक़ाअध्यक्ष उमेश कुळकर्णी,गणपत वालकर, श्री म्हापसेकर,महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page