राऊतांचे डिपाॅझिट जप्त करणार…

नारायण राणे:कणकवलीत नारायण राणे यांची पाटीदार (पटेल) समाजाने घेतली भेट

⚡कणकवली ता.२२-: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रातील मोदी सरकारला व मला शिव्या घालण्यापलीकडे विरोधकांनी काहीच काम केलेले नाही. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार विनायक राऊत यांचे मी डिपाझिट जप्त करणार, असा विश्वास महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.
ओमगणेश निवासस्थानी पटेल समाज बांधवांनी राणे यांची भेट घेत त्यांनी राणेंना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर झालेल्या बैठकीत श्री. राणे बोलत होते. यावेळी आमदार नीतेश राणे, पाटीदार समाजाचे नितीन पटेल, रमण पटेल, मनीभाई पटेल, हितेश पटेल, सुरेश पटेल, बाबुभाई भानुशाली, मंथन पटेल, डॉ. मिलिंद कुलकर्णी, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
राणे म्हणाले, नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही देशाची गरज आहे. मोदी हे अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. जगात भारत देशाला तिसऱ्या स्थानावर नेण्यात मोदींचा सिंहाचा वाटा आहे. गुजराती समाज बांधव मला भेटला याचे मनापासून समाधान वाटले. मी मुंबईत मोठा झालो. त्यामुळे गुजराती समाजाचे माझे जवळचे संबंध आहेत. मी उद्योग, व्यवसाय करतो. माझ्या व्यवसायवृद्धीसाठी गुजराजी समाजबांधवांचे मार्गदर्शन घेतले. वर्षाला दोन हजार कोटींची उलाढाल करणारा गुजराती माणूस सुद्धा सामान्य माणसासारखा राहतो. ही गुजराती समाजाची पद्धत इतरांनी आत्मसात केली पाहिजे. तुमच्यासारख्या गुजराती व्यापाऱ्यांकडून स्थानिकांना सुद्धा मार्गदर्शन झाले पाहिजे. गुजरात कचमधून येणाऱ्या रेल्वे गाड्या कणकवलीत, जिल्ह्यात थांबाव्यात यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे चिपी विमानतळवरून गुजरात जाता येईल अशी सेवा देणार, असे आश्वासन राणे यांनी दिले.
यावेळी पाटीदार समाज बांधवांनी आपली मते मंडताना महायुतीचे सरकार पुन्हा यावे इच्छा व्यक्ती केली. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी पटेल समाज काम करणार राहणार आहे. त्यासाठी लागणारे सर्व योगदान पाटीदार पटेल समाज देईल, असे समाजबांधवांनी सांगितले.

You cannot copy content of this page