मिलाग्रीस हायस्कूलमध्ये सुरू असलेल्या समर कॅम्पला जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची भेट…

⚡सावंतवाडी ता.२२-: मिलाग्रीस हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या संकल्पनेतून मिलाग्रीस हायस्कूलमध्ये दिनांक 15 एप्रिल 2024 ते दिनांक 27 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये समर कॅम्प सुरू आहे. दरम्यान दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा अधिकारी सौ. विद्या शिरस मॅडम यांनी या समर कॅम्पला भेट दिली.

प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ यांनी सौ.विद्या शिरस मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यानंतर सौ.विद्या मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ .मेघना राऊळ तसेच एप्रिल कमिटीचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page