कणकवलीतून सायकल चोरीस…

⚡कणकवली ता.२१-: शहरातील एका खासगी क्लासमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आपली सायकल क्लासच्या बाहेर लॉककरून ठेवली होती. सदर सायकल अज्ञात चोरट्याने चोरली. हा प्रकार रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. विद्यार्थिनीला सायकल चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर तिने व तिच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी तक्रार नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

You cannot copy content of this page