हनुमान जयंतीनिमित्त वायरी भरडेवाडा येथे कार्यक्रम..

⚡मालवण ता.२१-:
हनुमान जयंती उत्सवानिमित्त श्री मारुतीमंदिर वायरी रोड भरडेवाडा येथे दि. २२ व २३ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ रोजी सायंकाळी ६ वाजता भजने, २३ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता ह. भ. प. महेश धामापूरकर यांचे हनुमान जन्मोत्सवावर कीर्तन, दुपारी ११ वाजता सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता संगीत भजने, रात्री ९.३० वाजता रंगखांब ग्रुप कणकवली प्रस्तुत व्हरायटी शो होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन श्री हनुमान मित्रमंडळ वायरी भरडेवाडा यांच्यावतीने करण्यात आले आहे

You cannot copy content of this page