नारायण राणें: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी ऋणी अाहे..
कणकवली ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी घोषित केली. मला उमेदवारी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी ऋणी अाहे. कारण या नेत्यांमुळे मला उमेदवारी मिळाली आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
जिंकण्यासाठी अाम्ही लढत असून अडीच लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार, अशी प्रतिक्रिया केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आेम गणेश या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना दिली.
