तात्काळ योग्य तो बंदोबस्त कराःराष्ट्रवादीच्या युवती जिल्हाध्यक्षांची पालिका प्रशासनाकडे मागणी..
⚡सावंतवाडी ता.१८-: शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढलेली असतानाच आता पिसाळलेल्या आणी जखमी कुत्र्यांची भिती निर्माण झाली आहे अनेक कुत्रे जखमी अवस्थेत आक्रमकरीत्या फीरताना दिसत आहेत अशा कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे
याबाबत राष्ट्रवादीच्या युवती जिल्हाध्यक्षा सौ सावली पाटकर यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहेत.
शहरात आणी विशेषतः मोती तलावाच्या पसिरात मोकाट कुत्र्यांची संख्या जास्त आहे यातील अनेक कुत्रे जखमी आणी पिसाळलेले असल्यामुळे त्या ठीकाणी फीरण्यासाठी येणार्या जेष्ठ नागरीक कींवा लहान मुलांवर त्यांच्याकडून हल्ला होवू शकतो त्यामुळे कीमान जखमी असल्याने आक्रमक असलेल्या कुत्र्यांचा तरी योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी त्यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे
