‘डांबरट’च्या पहिल्या शो हाऊसफुल्ल गर्दी…

शो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी केले कलाकारांचे कौतुक..

⚡कणकवली ता.१८-: सिंधुदुर्गातील रविकरण शिरवलकर याने मालवणी कलाकारांना घेऊन आर. शिरवलकर या बॅनरखाली बनवलेला ‘डांबरट’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात या चित्रपटाचे 13एप्रिलला शो दाखविण्यात आले. त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शोनंतर प्रेक्षकांनी मालवणी कलाकारांनी एकत्र येऊन केलेला हा चित्रपट म्हणजे एक धडसाचे पाऊल आहे, अशा शब्दांत त्यांचे कौतूक केले.


आर. शिरवलकर या बॅनरखाली हा सुमारे 150 स्थानिक कलाकरांच्या सहभागानेडांबरट हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरणसिंधुदुर्गात विशेषतः कणकवलीत झाले आहे. डांबरट म्हणजे अर्थात ही कथा आहे,अशा एका डांबरट माणसाची. यामध्ये राजकारणावर भाष्य आहे. आजकाल सुरुअसलेल्या चैन मार्केटिंगच्या फसवणुकीवर, अंश्रद्धेवर, कोणावर किती विश्‍वासठेवावा आदी अनेक विषयाचे कंगोरे या चित्रपटात घेण्यात आले आहे. निर्माताआणि दिग्दर्शक रवीकरण शिरवलकर या अवलिया अष्टपैलू आणि हरहुन्नरीकलाकाराने अत्यंत मेहनतीने आणि कोकणी मातीतल्या आपल्या स्थानिक सहकारीमित्र व कलाकरांच्या मदतीने या चित्रपटासाठी मेहनत घेतली आहे. त्यातही विशेषम्हणजे अत्यंत तुटपुंज्या शुटिंग साहित्याच्या साहय्याने हा प्रयोग यशस्वी करूनदाखवला आहे.
या चित्रपटाचे संवाद लेखन श्याम सावंत यांचे तर छायाचित्रण अवधूत लाड यांनीकेले आहे. चित्रपटात मिलिंद गुरव, अक्षता कांबळी, सुहास वरूणकर, भावनाकुलकर्णी, सिद्धेश कांबळी, अजुन कांबळी, मंदार शेट्ये, राहुल कदम, अमदज शेख,दीक्षा पुरळकर, महेश चिंदरकर, राजेंद्र रावले, विवेक वाळके, सिद्धेश खटावकरमुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय इतर दीडशे कलाकार या चित्रपटाचा महत्वाचाभाग आहे. डांबरट या चित्रपट एक अविस्मरणीय फॅमिली एंटरटेनर असून यातअनेक चांगल्या व वाईट घटनांवर प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे सलग दोन शो लावण्यात आले होते, हे शो हाऊसफुल्ल झाले होते.

You cannot copy content of this page