देवगड
भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भूमीत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य सावर्डे गावामध्ये गेली १३१ वर्षे दिमाखात साजरा होत असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा श्रीराम मंदिर सावर्डे कासारवाडी यांचे मार्फत मोठ्या उत्साहात पार पडत आहे.
सावर्डे कासारवाडी येथील जैन कासार समाजातील कुटुंबीयांनी आपल्या धर्माची परंपरा, संस्कृती जोपासत असताना श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा देखील दिमाखदार पणे साजरा करीत आहे ही बाब निश्चितपणे अभिमानास्पद असून सावर्डे कासारवाडी येथील जैन कासार समाज बांधवांची एकजूट महिला मंडळाचे आदर्श संघटन ,कार्य निश्चितपणे सावर्डे गावाला भूषणावह आहे. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा हा खऱ्या अर्थाने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना प्रोत्साहन देणारा व त्यांच्या कार्याचा ,यशाचा गौरव करणारा आहे .असे प्रतिपादन दिगंबर जैन कासार समाज संस्था कोकण विभाग अध्यक्ष दयानंद मांगले यांनी सावर्डे येथील श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात बोलताना केले.
श्रीराम मंडळ सावर्डे कासारवाडी यांच्या वतीने १३१ वा श्रीराम जन्मोत्सव सोहळा रविवार दि. १४ एप्रिल ते गुरुवार दि. १८ एप्रिल २०२४ या कालावधीत श्रीराम मंदिर सावर्डे कासारवाडी येथे पार पडला. यानिमित्ताने या निमित्ताने सलग पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, त्याचबरोबर भजन कीर्तन ,नियमित श्रींची पूजा व आरती श्री सत्यनारायण महापूजा या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सकाळी ८ वाजता श्रींची पूजा व आरती त्यानंतर श्री कुमार जोशी महाराज रत्नागिरी यांचे कीर्तन ,जन्मोत्सव सोहळा ,महाप्रसाद ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा ,सायंकाळी हरिपाठ ,सीतामाई महिला मंडळ सावर्डे कासारवाडी यांचेमार्फत दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या दिपोत्सवाचे उदघाटन दयानंद मांगले व दिपराज बिजीतकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. रात्री १० वाजता श्रीराम पालखी दिंडी सोहळा कालिका देवी भजन मंडळ व कुडप कासारवाडी विभाग यांच्या वतीने पार पडला .या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष विजय वारे प्रमुख पाहुणे दिगंबर जैन कासार समाज संस्था कोकण विभाग अध्यक्ष दयानंद मांगले सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार सचिव उप कोषागार अधिकारी देवगड दिपराज बिजीतकर, उपाध्यक्ष निलेश वारे देवराज गरगटे ,सचिव रमेश मोहिरे ,सहसचिव सचिन पोकळे खजिनदार विजय डोंगरे सह खजिनदार राजेश मोहिरे, महिला अध्यक्षा सौ शर्वरी डोंगरे, तसेच अन्य सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होते.
या सोहळ्याचे प्रस्ताविक मंडळाचे अध्यक्ष विजय वारे यांनी करून मंडळाच्या कार्याची व उपक्रमाची माहिती दिली .यावेळी सौ स्वाती भोकरे, सुभाष मोहिरे यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन केले. सोहळ्याचे सूत्रसंचालन तुषार बिजीतकर यांनी केले., या प्रसंगी समाजातील ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह गुलाब पुष्प देऊन करण्यात आला.: प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक सौ अनिता आत्माराम पोकळे, सौ निर्मला मधुकर पोकळे ,सौ सुरेखा विठोबा,दीडपैसे, श्री सुरेश दगडू मोहिरे यांचा तर विशेष सन्मान सौ स्वाती संदीप भोकरे, (सेवानिवृत्त कर्मचारी)सिद्धी देवदत्त डोंगरे(अन्नदान) ग्रामसेवक विशेष पुरस्कार प्राप्त रमेश आत्माराम मोहीरे ,सौ.शर्वरी शेखर डोंगरे यांचा समावेश होता. विद्यार्थी गुणगौरव सन्मान अथर्व रवींद्र पोकळे, सिया राजेंद्र वारे ,प्रणव विनोद डोंगरे ,ओंकार सुभाष पोकळे, पूनम दीपक बिजीतकर, हर्षदा विनोद डोंगरे, सुयोग राजेंद्र डोंगरे ,नेहा विकास बिजीतकर, रुद्र प्रथमेश मोहिरे ,दिया रोहन मोहिरे, युवराज प्रसाद मोहिरे ,आदित्य वैभव नरोटे ,सायली संजय मोहिरे या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.
