केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर…

कित्येक दिवस सुरू असलेल्या तिढा अखेर संपुष्टात:जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा जल्लोष..

⚡सावंतवाडी ता.१८-: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारी गेले कित्येक दिवस सुरू असलेल्या तिढा अखेर संपुष्टात आला असुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमधून जल्लोष व्यक्त केला जात आहे.

लोकसभेच्या या जागेसाठी शिंदे शिवसेनेतून उद्योजक किरण सामंत इच्छुक होते त्यांनी या जागेसाठी दावा केला होता गेले कित्येक दिवस त्यांनी उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नही सुरू ठेवले होते तर दुसरीकडे नारायण राणे यांची उमेदवारी जवळजवळ निश्चितच झाली होती त्यांनी प्रचार यंत्रणा हे दोन्ही जिल्ह्यांमध्ये सुरू केली होती परंतु अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यास वेळ लागला होता अखेर आज अधिकृतरित्या भाजपा कडून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे उमेदवारीवरून निर्माण झालेल्या तिढा अखेर सुटला आहे दुसरीकडे किरण सामंत यांना नेमका कोणता आश्वासन देण्यात आलय काय हे मात्र समजू शकले नाही मात्र आणि यांच्या उमेदवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे

You cannot copy content of this page