सौ. नीलम राणे: महिला शक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे पाठबळ दिले…
मालवण (प्रतिनिधी)
विकसित भारताचे स्वप्न घेऊन प्रगतीपथावर वाटचाल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना सर्वसामन्य जनता व महिलांसाठी देशभर राबवल्या जात आहेत. महिला शक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे पाठबळ दिले. कोकणतही महिला संघटितपणे आत्मनिर्भर होत आहेत. नारायण राणे यांच्या नेतृत्वात कोकणातही अनेक योजना, विकासाचे प्रकल्प आले. राणे हे सतत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा विकसित दिशेने वाटचाल करत असताना आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात आपल्या हक्काचे खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातुन लोकसभेत पाठवूया, असे आवाहन एसएसपीएम च्या अध्यक्षा सौ. नीलम राणे यांनी मालवण दौऱ्यात व्यक्त केले.
मालवण तालुक्यातील वराड व कुंभारमाठ येथे आयोजित कार्यक्रमात सौं. नीलम राणे यांनी महिला- भगिनींशी संवाद साधला. यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, प्रदेश कार्यकारीणी सदस्य संध्या तेरसे, प्रदेश महिला मोर्चा कार्यकारिणी सदस्य तथा प्रदेश निमंत्रक सौ. रश्मी लुडबे, मालवण तालुका अध्यक्ष सौ. पुजा करलकर, तालुका उपाध्यक्षा माधुरी मसुरकर, समीक्षा खोबरेकर, माजी जिल्हाध्यक्ष सुमेधा पाताडे, कणकवली माजी नगराध्यक्षा सौ. मेघा गांगण, कुंभारमाठ सरपंच सौ. पूनम वाटेगावकर, घुमडेच्या सौ. बिरमोळे सरपंच, आंनदव्हाळ सरपंच सौ. टेंबुलकर, कातवड सरपंच सौ. हळदणकर, सौ. प्रिया गोवेकर, सौ. अनिता गावकर, सौ. दिव्या मिसाळ, संजय गांधी निराधार कमीटी सदस्य सौ माधुरी मसुरक, ग्रामपंचायत सदस्य करिष्मा चिंदरकर, ग्रामपंचायत सदस्य नंदन केसरकर, बुथ कमीटी अध्यक्ष मोहन मसुरकर, बुथकमीटी अध्यक्ष अजय चव्हाण, बुथकमीटी अध्यक्ष हनुमंत सरमळकर, अभी परब, चेतन परब यांसह वराड, कुंभारमाठ परिसरातील महिला उपस्थित होत्या.
सौ. माधुरी मसुरकर यांनी वराड गावाच्या वतीने नारायण राणे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊ, असे आश्वासन दिले. तर रश्मी लुडबे यांनीही भाजप महायुती उमेदवार यांना मोठे विजयी मताधिक्य मिळवून देण्यासाठी महिला पदाधिकारी सर्व सहकारी सज्ज असल्याचे सांगितले.
