माजी आमदार परशुराम उपरकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा…

⚡सावंतवाडी ता.१५-: माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांच्या माध्यमातून करण्यात आले.

होते यावेळी कोंडुरे येथील माऊली मूकबधिर व कर्णबधिर विद्यालयात मुलांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करून मुलांसहित केक कापण्यात आला व उपजिल्हा रुग्णालय येथे फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला तसेच उपरकर समर्थक आबा चिपकर यांच्या माध्यमातून रेडी येथील यशवंत गड किल्ल्यावर कुंड्या देण्यात आल्या व दोडामार्ग येथे गरजू कुटुंबांना उपरकर समर्थक निलेश देसाई यांच्याकडून धान्य वाटप करण्यात आले न्हावेली रेवोटेवाडी येथे मंदार नाईक न्यानेश्वर नाईक यांच्यावतीने क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले व येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी तिरोडा नाणोस अंगणवाडी येथे माजी आमदार उपरकर समर्थक मनोज कांबळी व पंकज पेडणेकर प्रणित तळकर यांच्याकडून बॅग वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर समर्थक आशिष सुभेदार मंदार नाईक नंदू परब मनोज कांबळी आबा चीपकर सुरेंद्र कोठावळे पंकज पेडणेकर प्रणित तळकर शुभम सावंत प्रवीण आरोसकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page