सिधुरत्न टॅलेंट सर्चमध्ये आराध्या पेडणेकर जिल्ह्यात प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.१४-: युवा संदेश प्रतिष्ठान तर्फे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत (एसटीएस) २०२४ परीक्षेत केंद्रशाळा मठ नं.१ ची इयत्ता दुसरी मधील विद्यार्थिनी कु. स्वराध्या निलेश पेडणेकर हिने २०० पैकी १९२ गुण मिळवून सुवर्णपदकासह जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.

  संस्थेमार्फत गोवा सायन्स सेंटर भेटीसाठी तिची निवड झालेली आहे. तसेच ब्रेन डेव्हलपमेंट २०२४ या परीक्षेत १०० पैकी ९० गुण मिळवून ब्राँझ पदक पटकावले आहे. स्वराध्याला तिचे आजोबा सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबूराव कांबळी तसेच वर्गशिक्षिका अंजली माडये यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अजित तांबे, तसेच सहाय्यक शिक्षक चिंदरकर, नाईक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ यांच्याकडून अभिनंदन केले आहे.

फोटो – आराध्या पेडणेकर

You cannot copy content of this page