राणें,सामंत यांच्या रस्सीखेच मध्ये आयत्यावेळी केसरकर उमेदवारीमिळविण्याच्या प्रयत्नात…

प्रवीण भोसलेंचा आरोप: केसरकर आणी राजन तेली आज जरी एकत्र आले तरी भविष्यात ते कदापी एकमेकांना साथ देणार नाही..

⚡सावंतवाडी ता.१०-: नारायण राणे व किरण सामंत याच्या रस्सीखेच मध्ये आयत्यावेळी दिपक केसरकर आपल्याला उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. आज ते आणि राजन तेली राजकीय दृष्टा एकत्र आले तरी भविष्यात ते कदापी एकमेकांना साथ देणार नाही असा दावा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी व्यक्त केला.

तर ज्याअर्थी विनायक राऊत यांच्यासमोर महायुतीला उमेदवार सापडत नाही त्याअर्थी राऊत हे दोन लाखाच्या फरकाने निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले,तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, तालुकाध्यक्ष पुडलिंक दळवी, काँग्रेस शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासकर,मायकल डिसोझा, शैलेश गवंढलकर,अशोक परब,कौतुभ गावडे, शहर अध्यक्ष देवा टेमंकर,सायली पाटकर,आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page