हायव्होलटेजमुळे घरांमधील विद्युत उपकरणे जळाली…

रेल्वे स्थानक परिसरातील प्रकार ः ट्रान्सफार्मर बदलण्याचे सुरु होते काम..

⚡कणकवली ता.०८-: रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या ट्रान्सफार्मर बदलण्याचे काम महावितरणकडून सोमवारी सकाळी हाती घेण्यात आले होते. त्यामुळे स्थानक परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. ट्रान्सफार्मर बदलण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रात्री विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, हायव्होलटेजमुळे स्थानक परिसरातील 20 ते 25 घरांमधील विद्युत उपकरणे जळाली. हा प्रकार रात्री 8.15 वाजण्याच्यासुमारास घडला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नागरिकांनी घटनास्थळी जात या प्रकाराबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. मात्र, हायव्होलटेज प्रकार कशामुळे घडला याचे नेमके कारण त्यांना सांगता आले नाही. हायव्होलटेजमुळे घरांमधील जळालेल्या विद्युत उपकरणांची नुकसान भरपाई कोण देणार असा सवाल नागरिकांनी केला. दरम्यान, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी नगरसेवक संजय कामतेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. महावितरणच्या अभियंत्याला धारेवर धरत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

You cannot copy content of this page