मयताच्‍या वारसासाच्‍या खात्‍यात स्‍टेट बॅंक देवगड शाखेकडून अपघात विम्‍याचे दहा लाख रूपये जमा…

⚡देवगड ता.०८-: देवगड आनंदवाडी येथील तेजस तुकाराम बांदेकर या युवकाचा जामसंडे दिर्बादेवी एस.टी. थांब्‍याच्‍या नजीक एस.टी.च्‍या धडकेत मृत्‍यू झाला होता. तेजस याचे देवगड स्‍टेट बॅंक शाखेत बचत खाते होते.

व्‍यक्तिगत अपघात विम्‍यापोटी त्याच्‍या बचत खात्‍यातून वार्षिक हप्‍ता एक रकमी रूपये पाचशे बॅंकेकडून जमा करण्‍यात आले होते. तेजस बांदेकर या तरूणाचा अपघात मृत्‍यू झाल्‍याचे समजताच देवगड स्‍टेट बॅंक व्‍यवस्‍थापक गणेश शिंदे यांनी दखल घेवून संबधिताच्‍या वारसास अपघात विम्‍याचे दहा लाख लवकारात लवकर मिळवून देण्‍यासाठी आपले स्‍तरावरून प्रयत्‍न केले. यामुळे मयत तेजस बांदेकरच्‍या पश्‍चात त्‍याची आई तेजस्विनी बांदेकर यांच्‍या खात्‍यात तातडीने अपघात विम्‍याचे दहा लाख रूपये जमा झाले याबाबतचे पत्र सामाजिक बांधिलकी चे भान ठेवून स्‍वत: बॅंक व्‍यवस्‍थापक गणेश शिंदे यांनी आंनदवाडी येथे जावून तेजस्विनी बांदेकर यांच्‍या स्‍वाधिन केले. यावेळी त्‍यांच्‍या सोबत आशय मेस्‍त्री सर्व्‍हीस मॅनेजर,फिल्‍ड ऑफिसर संदेश घोरपडे,अनिल कदम,तेजस खराडे ,मंगेश तावडे व विशाल जाधव आदी उपस्थित होते.याबाबतची माहिती प्रसिध्‍दीस देताना अपघात प्रसंगी बॅंकेकडून एक रकमी आर्थिक मदत मिळण्‍यासाठी खातेधरकांनी अपघात विमा करण्‍याचे आवाहन बॅंक व्‍यवस्‍थापक शिंदे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page