⚡मालवण ता.०८-: तोंडवळी सापळेबाग येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. प्रवेशकर्ते पैकी काहीजण शिंदे गटात कार्यरत होते, अशी माहिती मालवणचे माजी नगरसेवक मंदार केणी यांनी दिली.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उदय दुखंडे, विनायक परब, विभागप्रमुख समीर लब्दे, पपू परुळेकर, माजी नगरसेवक नितीन वाळके, माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती यतीन खोत, भाई कासवकर, तोंडवळी उपसरपंच हर्षद पाटील, सौ. स्नेहा नाईक, पुनम चव्हाण, श्वेता सावंत, दीपा शिंदे, निनाक्षी मेतर, वायंगणी उपसरपंच आस्वलकर मॅडम, माजी सरपंच सौ. संजना रेडकर, तोंडवळी माजी उपसरपंच दशरथ वायंगणकर, माजी उपसरपंच संजय केळुसकर, शाखा प्रमुख दिलीप पुजारे, माजी सरपंच सौ प्रतीक्षा पाटिल, प्रमोद पाटील, उप शाखा प्रमुख बंटी गोलतकर, तोंडवळी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश गोलतकर, वायंगणी ग्रामपंचायत सदस्य बाप्पा वायंगणकर, नाना पाटील, राजा पेडणेकर, शेखर तोंडवळकर, दीपक कांदळकर, सचिन रेडकर यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रवेशकर्ते मध्ये श्रीराम तळाशिलकर, गोपाळ केरकर, नवनाथ केरकर, शैलेश केरकर, रामदास केरकर, देविदास केरकर, हनुमंत केरकर, प्रफुल्ल सारंग, गायत्री केरकर, विलास केरकर, विना केरकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला, असे मंदार केणी यांनी सांगितले.
