⚡कणकवली ता.०८-: हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रा. पं. सदस्य अनिल खोचरे यांच्यासह कायर्कर्त्यांनी अामदार नीतेश राणे यांच्यावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला. नीतेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. तुकाराम खोचरे , संतोष परब , विशाल परब , गुंडु परब , दुर्वांक परब , तन्मय परब , प्रशांत अपराज , प्रवीण परब , नारायण खोचरे , जयप्रकाश खोचरे , मंगेश राऊळ , महेश शिरसाट , सुधाकर वाळके , संजय तोरस्कर , रिजवान पटेल ,शाहरुख पटेल , न्यामद पटेल , सुभाष सोहनी , दीप खोचरे , सरफराज शेख , विनोद वर्देकर , सुहास ढवण , यशवंत खोचरे आदींसह शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत , तालुकाध्यक्ष संतोष कानडे , मिलिंद मेस्त्री , राजू पेडणेकर , बुलंद पटेल यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
