तळेरे चाफार्डेवाडी येथून १ लाख ५९ हजार रुपयांची गोवा बनावटी दारू जप्त…

कणकवली पोलिसांची कारवाई: दोघांवर गुन्हा दाखल..

⚡कणकवली ता.०४-:
कणकवली पोलिसांनी तळेरे चाफार्डेवाडी येथील माळरानावर छापा टाकून १ लाख ५९ हजार २०० रुपयाची गोवा बनावटी दारू जप्त केली. ही कारवाई बुधवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी तेजस रवींद्र भांबुरे (३४, रा. तळेरे बाजारपेठ) व तुषार चंद्रकांत पेडणेकर(३६, रा. चिंचवली भंडारवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कणकवली पोलिसांना तळेरे चाफार्डेवाडी येथे गोवा बनावटी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कणकवली पोलिस तेथे गेले असता त्यांना तुषार पेडणेकर नामक व्यक्ती समोर बॉक्स घेऊन बसलेली आढळून आली. याबाबत त्याला विचारणा केली असता त्याने हा सर्व दारू साठा तळेरे बाजारपेठ येथील तेजस भांबुरे यांचा असून मी त्यांच्याजवळ काम करतो असे सांगितले. त्यानुसार कणकवली पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्यानुसार तेजस रवींद्र भांबुरे व तुषार चंद्रकांत पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

You cannot copy content of this page