सतीश आचरेकर यांची सामाजिक बांधिलकी…

रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णासाठी केले तातडीने रक्तदान..

⚡मालवण ता.०४‐: मालवण येथील एका रुग्णाला तातडीने औषधोपचार करण्यासाठी रक्ताची आवश्यकता होती. याबाबत माहिती मिळताच मालवण येथील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते सतीश आचरेकर व त्यांचे मित्र हरेश ढवळे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल होत रक्तदान केले.

सतीश आचरेकर हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. आजही रुग्णाची रक्ताची आवश्यकता लक्षात घेता सतीश आचरेकर व सहकारी यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

You cannot copy content of this page