*मळगाव येथून वृध्द बेपत्ता*

*💫सावंतवाडी-:* सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील 65 वर्षीय वृद्ध बेपत्ता झाले असून, अविनाश शिवराम पडवळ (रा. ब्राह्मण पाठ) असे त्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत येथील पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. अविनाश पडवळ हे 19 मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता घराबाहेर पडले, ते रात्री घरी न परतल्याने त्यांची शोधाशोध करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे देखील चौकशी केली ;मात्र ते सापडले नाहीत अखेर येथील पोलिस ठाण्यात त्यांची पत्नी अश्विनी अविनाश पडवळ हिने दाखल होत याबाबतची खबर दिली असून बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे करीत आहेत.

You cannot copy content of this page