⚡मालवण ता.०१-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात मराठी अर्थशास्त्र परिषद व स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय – अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. शंकर मोडक व्याख्यानमाला संपन्न झाली. यामध्ये संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनंत लोखंडे यांनी ‘महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्थेची सद्यस्थिती आणि आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करत महाराष्ट्रातील जमीन, रेल्वे, हवाई व जलवाहतुकीची सद्यस्थिती काय आहे, आणि या संदर्भात आव्हाने कोणती आहेत, याविषयी आकडेवारीसह उद्बोधित केले.
या व्याख्यानमालेचे उद्घाटन कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर यांच्या हस्ते झाले. मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. दिलीप अर्जुने (जे. ई. एस. कॉलेज, जालना) हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. डॉ. अर्जुने यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात मराठी अर्थशास्त्र परिषदेचा हेतू ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत आणि लोकांपर्यंत अर्थशास्त्रीय संकल्पना पोहोचविण्याचे तसेच त्यांचे प्रश्न सोडविण्याचे असल्याचे सांगितले. परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय अधिवेशनांबरोबरच आयोजित केल्या जाणाऱ्या विविध व्याख्यानमाला यांची माहिती देऊन डॉ. शंकर मोडक यांच्या कार्याचीही माहिती दिली.
या उपक्रमा दरम्यान सिंधुदुर्ग महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. देविदास हारगिले लिखित ‘सिंधुदुर्गातील भातशेती’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर डॉ. सुमेधा नाईक यांनी प्रमुख अतिथींचा परिचय व स्वागत केले. प्रा. प्रमोद खरात यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. कैलास राबते यांनी आभार मानले.
यावेळी डॉ. सुरेश चौथाईवाले, प्रा. बी.एच. चौगुले, डॉ. एच. एम. चौगुले, प्रा. एस. पी. खोबरे, प्रा. एस. एस. पवार, प्रा. यु. डी. मेस्त्री, प्रा. संकेत बेळेकर,प्रा. स्नेहा बर्वे, प्रा. हसन खान, प्रा. अन्वेषा कदम, प्रा. धामापूरकर, प्रा.मिलन सामंत आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रेया अटक, सुजाता दुर्गुळे, मनाली भोगले, सचिन भोगले, संदेश बांदल, चैतन्य ठाकूर, पूजा मेस्त्री,नेहा चव्हाण, श्रुती पाटील, मेलसिया मेंडिस, प्रणाली बांदेकर यांनी विशेष सहकार्य केले.
