ऑन द स्पॉट पेंटिंग स्पर्धेत प्रवीणकुमार नडगेरी प्रथम…

*💫मालवण दि.२३-:* मुंबई विद्यापीठाच्या ५३ व्या युवा महोत्सवाच्या पात्रता फेरीत ऑन द स्पॉट पेंटिंग कलाप्रकारात झोन ११ सिंधुटुर्गमधून मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा द्वितीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी प्रवीणकुमार नडगेरी याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. नडगेरीची ऑन द स्पॉट पेंटिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. मुंबई विद्यापीठाचा ५३ वा युवा महोत्सव व्हर्चुअल पद्धतीने झाला. मुंबई विद्यापीठामधून ३२ महाविद्यालये सहभागी झाली होती. जिल्ह्यातील आठ महाविद्यालये सहभागी झाली होती. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. शंकर खोबरे यांनी युवा महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रवीणकुमार नडगेरी याचे कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page