वैभव सगरे यांचे आश्वासन ; सुरेश भोगटे यांनी घेतली पुन्हा भेट
⚡सावंतवाडी ता.२६-: येथील शहरात घालण्यात आलेले गतिरोधकाची तीव्रता येत्या दोन दिवसात कमी करून देण्याचे आश्वासन बांधकामाचे अधिकारी वैभव सागरे यांनी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांना आज येथे दिली. याबाबत श्री भोगटे यांनी आज श्री सागरे यांची भेट घेत चर्चा केली.
याबाबत अधिक माहिती अशी की काही दिवसांपूर्वी शहरात घालण्यात आल्यास स्पीड ब्रेकरमुळे अनेक नागरिकांना याचा त्रास होत होता त्यामुळे त्याची तीव्रता कमी करण्यात यावी आशी मागणी श्री.भोगटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. दरम्यान होळीची सुट्टी आल्याने ते होऊ शकले नसले तरी आपण येत्या दोन दिवसात ती तीव्रता कमी करून देऊ असे आश्वासन श्री सागरे यांनी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांना दिले.
